टेम्पो चालक जखमी:महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच..
कुडाळ, प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर पावशी भंगसाळ नदी पुलानजीक शनिवारी सकाळी १० च्या सुमारास कामगार मध्यान्ह भोजन घेऊन जाणारा टेम्पोचा अपघात झाला. टेम्पो चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पलटी होऊन अपघात झाला. यात टेम्पोचालक जखमी झाला आहे. त्याला कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, कुडाळ एमआयडीसीतून धुरी हे मध्यान्ह भोजनाचा टेम्पो घेऊन ओरोसच्या दिशेने जात होते. त्यावेळी भंगसाळ नदी पुलानजीक वळणावर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. महामार्गावर या अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चालकाला वाहन नियंत्रण ठेवता येत नाही. आजवर या ठिकाणी अशाच १२ अपघात झाले आहेत. त्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीने येथील दुरुस्ती करून पाणी निचरा करणे महत्वाचे ठरणार आहे
