अवैध दारू वाहतूक प्रकरणी कणकवली येथील दोघांना घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई:38 लाखाचा मुद्देमाल जप्त..

⚡सावंतवाडी ता.०८-: मुंबई गोवा महामार्गावर गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना स्विफ्ट कार व फॉर्च्यूनर कार ताब्यात घेण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने करण्यात आली. या तब्बल 38 लाख 32 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चेतन भरत वाळके वय 27 रा.कणकवली व महेश्वर हनुमंत मोरे वय 37 दोन्ही राहणार कणकवली आशी त्यांची नावे आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक नितीन वगाटे यांनी जिल्हयातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना सिंधुदुर्ग जिल्हयातील अवैध धंदयांचे समूळ उच्चाटन करुन अवैध धंदयांमध्ये गुंतलेल्या इसमांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार आज 8 सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळी गोवा मुंबई हायवेवरुन फॉर्च्यूनर कार व स्विफ्ट कार यामधून गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक गोव्याकडून मुंबईच्या दिशेने होणार आहे, अशी खबर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास मिळाल्याने पहाटे 4.30 वाजताचे दरम्यान सापळा रचून फॉर्च्यूनर कार क्र. MH 01/BC/ 1616 व स्विफ्ट कार क्र. MH 07/AB/5354 हया गाडयांवर कायदेशीर कारवाई केली. त्यामध्ये 8 लाख 32 हजार 800 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारु व 30 लाख रुपये किमतीच्या 2 कार असा एकूण 38 लाख 32 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये चेतक भरत वाळवे, वय 27 रा. तिवरे वाळवेवाडी, ता. कणकवली आणि महेश्वर हनुमंत मोरे, वय 37 रा. कलमठ मोरेश्वरनगर, ता. कणकवली यांना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून चालू आहे.
अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक संदिप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, पोलीस नाईक, चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.

You cannot copy content of this page