पोषण माह निमित्त राज्यस्तरीय शालेय पोषण स्पर्धा

⚡कणकवली ता.०५-:
सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, याच अनुषंगाने यंदा महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठी पोषण स्पर्धा आयोजित केलेली आहे, यात खाजगी तसेच सरकारी कोणतीही शाळा सहभागी होवू शकते, यासाठी कसलेही प्रवेश शुल्क नाही, यात विद्यार्थ्यांसाठी पोषणावर आधारित प्रश्न मंजूषा तर शाळा स्तरावर पोषणासाठी मायक्रोग्रीन तयार करणे या स्पर्धा घेण्यात येणार आहेत .
प्रश्नमंजूषा स्पर्धा दोन स्तरावर होईल पहिल्या स्तरावर शाळेतच होईल त्यातून जे पुढे येतील ते दुसऱ्या स्तरावर राज्यातील इतर शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करतील. या दोन्ही स्पर्धात जिंकणाऱ्या शाळेला व विद्यार्थ्याना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी प्रमोद शिंदे- ९९६७०१३३३६, मंगेश नेवगे ७०२८४२६०६६ यांच्याशी संपर्क साधावा.

अनेमिया फ्री इंडिया फोरम ही एक देशस्तरावर कुपोषण व रक्तक्षयाविरोधात कार्य करणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक संस्थानी एकत्र येवून उभारलेली चळवळ आहे. आपल्या आजूबाजूच्या सहज सापडणाऱ्या अगदी माफक अशा सेंद्रिय पोषण परसबागेतील भाज्या तसेच मायक्रोग्रीन द्वारे अनेमिया व कुपोषणावर मात करता येते, ह्या विचारातून उभारलेले हे मंच आहे. या फोरम च्या माध्यमातून प्रशिक्षण, सत्र, स्पर्धा असे अनेकांगी मोफत उपक्रम राबविण्यात येतात.

You cannot copy content of this page