जी. ए. कुलकर्णी शताब्दी संस्मरण कथा अभिवाचन कार्यक्रम

⚡कणकवली ता.०५-: ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा अभिवाचन जागर कार्यक्रमातील तिसरा, सप्टेंबर महिन्यातील कार्यक्रम ९, १० आणि ११ सप्टेंबर रोजी अनुक्रमे तळेरे, कणकवली आणि कुडाळ येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन अभिवाचक जी.एं.च्या तीन कथा सादर करतील. ‘पाणमाय’ ही कथा कणकवलीच्या पूजा सावंत, ‘राणी’ ही कथा देवगडच्या ॲड. अपर्णा परांजपे-प्रभू तर ‘पडदा’ ही कथा मालवणचे रंगकर्मी आणि सजग वाचक संजय शिंदे सादर करणार आहेत.

कणकवलीतील कार्यक्रम वामन पंडित यांच्या निलायम द ब्ल्यू बॉक्स येथे, तळेरेतील कार्यक्रम संवाद परिवारातर्फे तळेरे येथे आणि कुडाळ येथे बाबा वर्दम थिएटरर्स तर्फे कुडाळ हायस्कूल हॉल क्र. १ येथे सादर होईल. रसिक श्रोत्यांनी आपआपल्या सोईनुसार त्या त्या ठिकाणी उपस्थित राहून या अभिवाचन जागराचा लाभ घ्यावा असे सर्व आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता सुरू होतील.

You cannot copy content of this page