गणेश विसर्जनासाठी घाट पायऱ्या बांधाव्या

साटेली भेडशी उपसरपंचांची ‘बांधकाम’ कडे मागणी

⚡दोडामार्ग,ता.०५-: साटेली भेडशी खालचाबाजार येथे नदीवर गणेश विसर्जनासाठी तत्काळ घाट पायऱ्या बांधून गैरसोय टाळावी, अशी मागणी
साटेली भेडशी उपसरपंच गणपत डांगी यांनी सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता अनिल बडे यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे,यावर्षी दोडामार्ग तिलारी राज्य मार्गावरील साटेली भेडशी खालचा बाजार येथे नवीन पूल बांधण्यात आला. काम करण्यात आले.त्यावेळी गणेश विसर्जनासाठी असलेल्या घाट पायऱ्या
तोडण्यात आल्या. गणेशोत्सव जवळ आल्याने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. तसेच पुलाची उंची वाढल्याने घाट पायऱ्याशिवाय विसर्जन करणे गैरसोयीचे आहे. नवीन घाट पायऱ्यांसाठी निधी उपलब्ध असून त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात गणेश विसर्जन घाट पायऱ्यांची व्यवस्था करावी,तसेच तेथे जाण्यासाठी पर्यायी मार्ग काढावा.

You cannot copy content of this page