शिक्षक समितीने राबविले सामूहिक रजा आंदोलन
सावंतवाडी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज येथे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती सावंतवाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सामूहिक किरकोळ रजा आंदोलन सोडले यावेळी आमच्या मागण्या सोडवण्यासाठी कोणतीही हालचाल न केल्यास हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती विराट मोर्चा काढेल असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला.
राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक न्यायसंगत मागण्या प्रदीर्घकाळ आहेत शासनाच्या वित्त शारीरिक शिक्षण ग्रामविकास नगर विकास विभागाकडून इतर शासकीय कर्मचारी व खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शिक्षकांना दुय्यम दर्जाची स्थापना भावाची वागणूक देण्यात येत असल्याचे अनेक बाबतीत प्रकर्षाने दिसून येत सातत्याने भेटी निवेदने विनंती करूनही कोणत्याच मागणीची दखल शासन स्तरावरून घेतली जात नसल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र तरीही शासनाकडून कोणतेही हालचाल नसल्याने आज एक पुन्हा एकदा शिक्षक देणे किरकोळ रजा आंदोलन करुन शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधले.
दरम्यान येणाऱ्या काळात च्या मागण्या संदर्भात शासनाकडून निर्णय घेतल्यास हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथमिक शिक्षण समितीच्या माध्यमातून विराट मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सावंतवाडी तालुकाध्यक्ष समीर जाधव, गोविंद शेर्लेकर,प्रशांत मंडगावकर, निलम बांदेकर, शिल्पा जाधव, धनदा शिंदे, सुनील गाड, तुषार आरोसकर, सतिश राऊळ आदी शिक्षक आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
