चौकुळ येथील राजू गावडे यांचे गोवा येथे निधन

सावंतवाडी :- चौकुळ येथील मूळ रहिवासी व सध्या राहत असलेले गोवा – पेडणे येथील राजू उर्फ राजेश दिगंबर गावडे यांचे आज सकाळी गोवा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. राजू गावडे यांनी सैनिक नागरी पतसंस्थेत काही दिवस वसुली अधिकारी म्हणून काम केले होते. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यावेळी त्यांनी काॅग्रेस पक्षाचे काम केले.

नंतर त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. माजी आमदार राजन तेली व त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मराठा समाजाचे ते सच्चे व निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांचे पार्थिव चौकुळ येथे आणल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी,तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे दर्शन घेतले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भगिनी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळव्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page