सुजाण मतदार हे भारतीय लोकशाहीचे मर्मस्थान आहे..

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे ; भोसले नॉलेज सिटी मध्ये लोकशाही जीवन प्रणाली आणि शिक्षण या विषयावर चर्चासत्र संपन्न..

⚡सावंतवाडी ता.०५-: भारताच्या लोकशाही समोर अनेक आव्हाने निर्माण झाली होती परंतु भारतीय लोकशाही अधिक प्रौढ झाली. स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकशाही तोडण्याचे काम अनेक वेळा झाले . परंतु भारतीय लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम येथील सुजाण मतदारांनी केले. सुजाण मतदार हे भारतीय लोकशाहीचे मर्मस्थान, बलस्थान आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी येथे केले. राज्य निवडणूक आयोग, भोसले नॉलेज सिटी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीने मंगळवारी भोसले नॉलेज सिटी मध्ये लोकशाही जीवन प्रणाली आणि शिक्षण या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी देशपांडे बोलत होते.

या परिसंवादामध्ये भाषाभ्यासक डॉ. प्रकाश – परब, अभिनेत्री संपदा जोगळेकर, प्राचार्य शमशुद्दीन नसीरुद्दीन आत्तार, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, छायाचित्रकार इंद्रजीत खांबे, मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार जुईली पांगम, मोहम्मद शेख, प्रसाद गावडे, पंकज दळवी हसन खान हे युवा प्रतिनिधी यांनी परिसंवादात भाग घेतला. जिल्हाधिकारी किशोर तावडे, भोसले नॉलेज सीटीचे अच्युत सावंतभोसले, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते

You cannot copy content of this page