सागर नानोसकर:केसरकरांच्या विरोधात युवा सेनेचे आंदोलन..
⚡सावंतवाडी ता.०५-: मंत्री दिपक केसरकरांनी प्रवक्तेगिरी करण्यापेक्षा स्थानिक डीएड बीएड धारकांचे प्रश्न सोडवावे अशी टीका युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर नानोसकर यांनी आज येथे केली. दरम्यान आज ठाकरे युवा सेनेच्या वतीने येतील केसरकर यांच्या निवासस्थानासमोर “बोंबाबोंब”आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांनी आंदोलन करत्यांना ताब्यात घेतले.
