⚡कणकवली ता.०५-:
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनच्यावतीने आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. यात संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या श्रुतिका वारंग हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-ज्ञानकुंज कॉलेज ओरोसच्या सनोली बुटे हिने द्वितीय तर कणकवली महाविद्यालयाच्या श्रावणी पाटकर हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक तेजस नाईक (इंजिनियरिंग कॉलेज, कणकवली), सायली चिके (खारेपाटण महाविद्यालय), गोपाळ सावंत ( ज्ञानकुंज कॉलेज, ओरोस), प्रीती परब (कणकवली महाविद्यालय), हेमाली आंबेरकर ( पंतवालावलकर कॉलेज, देवगड), पूजा वाघेरे (खारेपाटण महाविद्यालय) यांनी पटकाविले. स्पर्धेत ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षण प्रसाद घाणेकर, प्रा. विजय सावंत, प्रा. स्नेहा वंजारे यांनी केले होते.
रविवारी स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.सामान्य जनता व आजच्या तरुण पिढीमध्ये बँकिंग विषयी बँक राष्ट्रीय करणा विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष संतोष रानडे व बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणेचे निखिल साटम यांनी सांगीतले.
