बबन साळगावकर: मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी नगरपरिषदेने गणपती उत्सवाच्या साठी स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी पूर्वीच्या नियोजनाप्रमाणेच बसण्याची व्यवस्था करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिले आहे
दरम्यान कोकणातील गणेशोत्सव सर्वात मोठा उत्सव साजरा होत असतो या उत्सवासाठी देश विदेशातून मुंबई पुणे तसेच देशातील अन्य भागातून गणपती उत्सवासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरगुती गणपती गणेशोत्सवासाठी नागरिक येत असतात हा कोकणवास यांचा महत्त्वाचा उत्सव या उत्सवाची पूर्वतयारी सावंतवाडी नगरचे पूर्वीपासून करत आलेली आहे स्थानिक व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मुख्य बाजारपेठेमध्ये स्थानिक व्यावसायिकांना बसण्याची नियोजन केले जाते ते नियोजन गांधी चौक भांगले पेट्रोल पंप ते जयप्रकाश चौक तसेच वेलनेस ते आठ पेट्रोल पंप संपूर्ण मार्केटच्या भोवती बस बसण्याची व्यवस्था होत असते ती व्यवस्था तशीच राहवी आशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
