पर्यावरणाशी मैत्री करत एका चिमुकल्याने साजरा केला ” शिक्षक दिन “.

⚡सावंतवाडी ता.०५-: येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी कु. कबीर हेरेकर हा समाजात पर्यावरण व निसर्ग प्रेमी म्हणून प्रसिद्ध आहे. तो नेहमी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचे धडे गिरवत आसतो.
आज ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन या दिनाचे औचित्य साधून कबीर ने आपल्या शिक्षकांना एक वेगळी अशी भेट दिली.

कबीर ने शाळेतील प्रत्येक शिक्षकाला एक एक रोपटे दिले विशेष म्हणजे या रोपांना लावण्यासाठी त्याने ” टाकाऊ पासून टिकाऊ” ह्या संकल्पना साकारत त्याने प्लास्टिक चे डबे, काचेच्या बरण्या, शित पेयाची बॉटलस अशा गोष्टींचा वापर केला.
त्याची ही वेगळी संकल्पना शिक्षकांना खूप आवडली व भविष्यात आपण पण अश्या वस्तुचा योग्य वापर करु असे सांगितले.
कबीर च्या अशा उपक्रमातून सर्वांना प्रोत्साहन मिळेल हे नक्कीच.

You cannot copy content of this page