मसुरे गडगेरा वाडीतील १० वर्षे ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचा प्रश्न दत्ता सामंत यांनी सोडविला

⚡मालवण ता.०४-: गेली दहा वर्षे मसुरे गडघेरावाडी दत्त मंदिर येथील प्रलंबित असलेला ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भाजपचे नेते दत्ता सामंत यांनी पहिल्याच भेटीदरम्यान त्वरित दूर केला असून येथील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यासाठी दत्ता सामंत यांनी स्वतःच्या खिश्यातील सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून वीज वितरणच्या ठेकेदारास येथील ग्रामस्थांचा ट्रांसफार्मर शिफ्टिंगचा प्रश्न येत्या गणेश चतुर्थी पूर्वी सोडविण्यास सांगितले.

गेली दहा वर्षे येथील ग्रामस्थांनी आमदार खासदार प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटत नव्हता. यासाठी येथील ग्रामस्थांच्या वतीने माजी जि प अध्यक्ष सरोज परब,शिवाजी परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, महेश बागवे, माझी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर तसेच स्थानिक ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते. यावेळी मसुरे भेटी दरम्यान दत्ता सामंत यांनी या ट्रांसफार्मर ची पाहणी केली एखाद्या देवदूताप्रमाणे दत्ता सामंत यांनी एका शब्दातच येथील वाडीचा गेली कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी दत्ता सामंत आणि भाजपचे आभार मानले.

You cannot copy content of this page