शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची घोषणा;समाजाच्या नावाखाली कुणी राजकीय पोळी भाजु नये..
⚡कणकवली ता.०४-: आगामी लोकसभा निवडणुकीत उद्योगमंत्री ना.उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर अथवा उद्योजक किरण सामंत हे शिवसेनेचे खासदारकीचे उमेदवार असतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा शिवसेनेचाच असणार असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत केला. आम्ही मराठा समाजा सोबतच आहोत, पण समाजाच्या नावाखाली कुणी राजकीय पोळी भाजु नये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आरक्षणासाठी सकारात्मक आहेत.असेही ते म्हणाले.
कणकवली येथे शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे बोलत होते .
यावेळी शिवसेना विधानसभा संघटक संदेश पटेल, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरूणकर उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, भास्कर राणे,प्रशांत वनस्कर आदी उपस्थित होते.
संजय आग्रे महणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे आणि लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक ,मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, येत्या 8 सप्टेंबर पासून तीन दिवसांच्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. यावेळी लोकसभा उमेदवारीबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत. ही कार्यकर्त्यांची भावना आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याचे पालन केले जाईल. जिल्ह्यात 3 मतदारसंघ असून पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास त्यानुसार मतदारसंघात विधानसभा लढवेन असे आग्रे म्हणाले.
आम्ही मराठा समाजा सोबतच आहोत, पण समाजाच्या नावाखाली कुणी राजकीय पोळी कुणी भाजु नये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आरक्षणासाठी सकारात्मक आहेत. बाकीच्यांनी मोर्चा काढायचे, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी लगावला.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात किरण सामंत, उदय सामंत किंवा दीपक केसरकर, यांच्यापैकी कोणीही उमेदवार पक्ष देईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे श्री आंग्रे यांनी सांगितले. कणकवली, कुडाळमध्ये पण शिवसेनेचा उमेदवार राहू शकतो असे सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त आपणाला शुभेच्छा दिल्या असून यावेळी आपण मराठा आरक्षण संदर्भात भूमिका मांडली असून कोणत्या स्थितीत आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे सांगितले.
