⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला रोटरॅक्ट क्लब ऑफ मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा पदग्रहण अधिकारी असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्ग झोनच्या झेड.आर.आर.पदी प्रितीश लाड, तर रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी पल्लवी भोगटे व सचिवपदी निकिता निनावे यांची नियुक्ती करण्यात आली.
या सोहळ्यावेळी डी.सी.सी.राजेश घाटवळ, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष रोटेरीयन राजू वजराटकर तसेच सावंतवाडी रोटरॅक्ट क्लबचे सभासद उपस्थित होते.
