दीपक केसरकर मित्रमंडळाच्या गुरू सेवा गौरव पुरस्कारांची घोषणा…

दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिले जातात पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.०४-: दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून नामदार श्री दीपक भाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने गुरु सेवा गौरव पुरस्कार देण्यात येतो यावर्षी देण्यात येणारा पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावच्या सौ नेहा सावंत आणि कलंबिस्त येथील किशोर वालावलकर तसेच दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील दीपक गवळी व सोनावल माध्यमिक विद्यालयाचे नंदकिशोर म्हापसेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

याशिवाय वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा शाळेतील सिताराम नाईक आणि कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी या शाळातीलही प्राथमिक माध्यमिक व विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .

यंदाचे हे बारावे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, शाल श्रीफळ , स्मृतिचिन्ह , ग्रंथ असे आहे. कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर, माजी उपनगराध्यक्ष श्री. राजन पोकळे व मित्र मंडळाच्या पदाधिका-यानी अभिनंदन केले आहे.
5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील व चांगले शैक्षणिक कार्य करणा-या शिक्षकांचा गुरुसेवा पुरस्कार २०२३ देऊन गौरव केला जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यातुन दोन – एक प्राथमिक व एक माध्यमिक तसेच विशेष काम करणा-या शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे.यामध्ये अंगणवाडी ते महाविदयालयीन उपक्रमशील शिक्षक – शिक्षिकांची निवड केली जाते
सावंतवाडी तालुक्यातील सौ. नेहा नरेंद्र सावंत ( जि.प.शाळा इन्सुली नं.1 ), श्री. किशोर अरविंद वालावलकर , ( कलंबिस्त हायस्कूल कलंबिस्त ) दोडामार्ग तालुक्यातील – श्री. दीपक नामदेव गवळी, ( जि.प. शाळा साटेली भेडशी ) श्री. नंदकिशोर पांडुरंग म्हापसेकर, ( माध्य. विदयालय सोनावल ) *वेंगुर्ला तालुक्यातील – श्री. सिताराम अर्जुन नाईक , (जि. प.शाळा उभादांडा ) सौ. रेश्मा भालचंद्र चोडणकर , (दाभोली हाय. दाभोली,) *कुडाळ तालुक्यातील सौ. श्यामल चंद्रकांत धुरी, ( जि.प. सरस्वती विदयालय कालेली ) , सौ. दर्शना सुनिल वराडकर , (कसाल हाय. कसाल ), *मालवण तालुक्यातील- श्री. दिपक केशव गोसावी, ( जि.प. शाळा धामापूर ) , सौ. दिव्यता दिनेश परब, ( हिराबाई भा. वरसकर, विद्यामंदीर वराड ) *कणकवली तालुक्यातील- श्री. संजय गोपाळ सावंत ,( जि.प. शाळा फोंडा ), श्री. पी.जे कांबळी , ( विद्यामंदीर हाय. कणकवली ) *देवगड तालुक्यातील – श्री. दिनेश सुरबा दळवी , ( जि.प. शाळा जामसंडे नं.1) , श्री. अनिल देविदास घुगे, ( डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हाय. मुटाट ) *वैभववाडी-तालुक्यातील सौ. ज्योती जयवंत पवार ( वि.भ.करुळ गावठण शाळा ) श्री. संतोष यशवंत मोहिते , ( बालभवन विदयामंदिर मौदे ) यांना जाहीर झाला आहे
अंगणवाडी ते महाविदयालय विशेष सन्मान पुरस्कारात
श्री. कमलाकर सीताराम ठाकूर , ( केंद्रप्रमुख सावंतवाडी ) श्रीम. अर्चना एकनाथ आंबेलकर , (अंगणवाडी शिक्षिका ) सौ. माधवी मंगेश मसके, ( कुडाळ ) सौ. अनुराधा हरिश्चंद्र पवार, (अंगणवाडी जि प शाळा नं.2 सावंतवाडी ) , तसेच श्री. महेश लाडु सावंत, ( तळवडे नं.3 ) श्री. अरविंद नारायण सरनोबत , ( जि.प. शाळा माडखोल- धवडकी ), श्री. भिवा केशव सावंत, (आडेली नं.1 ) श्रीम. पूनम यशवंत खोराटे , ( बोडदे ) श्री. उदय वामन शिरोडकर , ( केंद्रप्रमुख ) श्री. शरद अर्जुन नारकर , ( नाधवडे नं.1 ) सौ. अश्विनी आनंद राणे, ( अंगणवाडी इन्सुली डोबाची शेळ ) , श्रीम. आनंदी रघुनंदन घोगळे . ( डी . एड . कॉलेज मालवण ) यांना जाहीर करण्यात आला आहे तर गुरूसेवा गौरव पुरस्कार सन २०२३ ची निवड समिती – श्री. भरत गावडे , श्री.विठठल कदम , श्री. म.ल.देसाई, श्री. अजय सावंत, श्री. आर . बी. गावडे, श्री. नारायण नाईक. असून सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर, माजी उपनगराध्यक्ष श्री. राजन पोकळे व मित्र मंडळाच्या पदाधिका-यानी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page