रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वेंगुर्ला बाजारपेठेत मार्गदर्शन

⚡वेंगुर्ला ता.०४-: पोलीस यंत्रणेच्या रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी वेंगुर्ला बाजारपेठ गाडीअडा नाका येथे रिक्षा-टेम्पो चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच दुचाकी वाहनधारक यांना वहातुकीबाबत सखोल मार्गदर्शन केले.
रस्त्यावर अडथळा होईल अशी वाहतूक उभी करू नये, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरू नये, टू व्हीलरवर हेल्मेट वापर नेहमीच करावा तसेच २ पेक्षा जास्त लोक बसू नये, रस्त्यावरील आखलेल्या पट्याच्या चिन्हाचा वापर करावा. १८ वर्षाखालील लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नये, मोबाईल कानास लावून बोलत वाहन चालवू नये, बाजारपेठेच्या ठिकाणी रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी वाहनाचे पार्किग केलेले आढळल्यास संबंधित वाहनधारक मालकांवर ऑनलाईन दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे श्री.जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
गणेश चतुर्थी सण उसाहात साजरा होताना कुठेही वाहनाची कोंडी आपल्या वाहनामुळे होऊ नये यासाठी वाहन मालक-चालक यांनी दक्षता घ्यावी. अशी सुचनाही वहातुक पोलीस हवालदार मनोज परूळेकर यांनी केली.
यावेळी वाहतूक पोलिस गौरव परब, सहायक पोलिस निरीक्षक संदेश कुबल, पोलिस हवालदार सुरेश पाटील, बंटी सावंत, पोलिस कर्मचारी अमर कांडर, तसेच रिक्षा चालक मालक संघटनेची माजी अध्यक्ष भाई मोर्जे, तसेच गणपत रेडकर, अरुण नाईक, सतीश परब, काका पालकर, सदानंद परब, रिक्षा टेम्पो युनियन अध्यक्ष शेखर शेणई, मकरंद भोगटे, दिलीप बागवे, हर्षद पालव, चंद्रकांत चोडणकर, धोंड आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page