महावितरणविरोधात कुडाळमध्ये
आमरण उपोषण सुरू

⚡कुडाळ ता.०४-: महावितरण कंपनी कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले अपघात प्रकरणी कोणतीही मदत मिळाली नसल्याने आज सकाळी १० वाजल्यापासून महावितरण जिल्हा कार्यालय कुडाळ येथे नागरिकांनी आमरण उपोषण छेडण्यात आले आहे.


२१ जुलै २०२३ रोजी कुडाळ येथे महावितरण कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले हे ११ केव्ही लाईनवर काम करीत असताना ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान फाले यांचे गोवा येथे निधन झाले होते. त्यानंतर धनंजय फाले यांच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत मिळावी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागण्या करण्यात आल्या. परंतु, या घटनेला एक महिना होऊन गेला असताना फाले कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमी आज सकाळी कुडाळ विकास समिती, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, महादेवाचे के ग्रामस्थ, पिंगुळी शेटकरवाडी, गुढीपूर ग्रामस्थ आणि कुडाळ तालुका धनगर समाज यांनी आमरण उपोषण छेडले आहे. यावेळी उपोषणकर्त्यानी महावितरण अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या उपोषणस्थळी कुडाळ तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष गोविंद सावंत, काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुडाळ शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, कानू शेळके, सुरेश वरक, गंगाधर कुबल, गंगाराम कोकरे, नितेश कोकरे आदी उपस्थित आहेत.

You cannot copy content of this page