बांदा केंद्र शाळेच्या किचनशेड बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न…

⚡बांदा ता.०३-: जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत लोकसहभागातून उभारण्यात येत असलेल्या नूतन किचनशेड बांधकामाचा भुमिपुजन सोहळा संपन्न झाला.
बांदा केंद्र शाळा ही जिल्ह्यातील मोठ्या पटसंख्येची शाळा म्हणून ओळखली जाते या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून देण्यासाठीची खोली ही मोडकळीस आली होती.यासाठी पालकसभेत लोकसहभागातून नवीन किचनशेड बांधकाम करणेबाबत ठरले होते यासाठी लोकांनी बांधकामासाठी आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते .या आवाहनाला प्रतिसाद देत रमेश महादेव मठकर व सीमा रमेश मठकर यांनी आपला मुलगा प्रणव रमेश मठकर यांच्या स्मरणार्थ दीड लाखाचा मदतनिधी उपलब्ध करून दिला आहे.या निधीतून शाळेसाठी सुसज्ज किचनशेड व धान्य साठविण्यासाठी गोडावून बांधकाम करण्यात येणार असून या कामाचा भुमिपुजन सोहळा नुकताच संपन्न झाला. मठकर कुटुंबियांनी केलेल्या या दातृत्वाबद्दल शाळेकडून अभिनंदन केले .
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिध्दये,, केंद्र प्रमुख संदीप गवस, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये,शिक्षक पालक उपाध्यक्ष हेमंत दाभोळकर, ग्रामपंचायत सदस्य बांदेकर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रूपाली शिरसाट, हेमंत मोर्ये सुशांत ठाकूर, संतोष बांदेकर, प्रमिला कदम, ग्रामस्थ अरूण मोर्ये,बी.एस सावंत,मेघा गवस,अमोघ सिध्दये, सदाशिव सावंत,रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष अक्षय मयेकर,पोषण आहार मदतनीस उमांगी मयेकर,शिक्षक जे.डी.पाटील, रंगनाथ परब,शांताराम असनकर, प्रदीप सावंत,,स्नेहा घाडी, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत,जागृती धुरी, मनिषा मोरे, सपना गायकवाड आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page