शिवसेना उपजिल्हा प्रमुख सेजल परब आयोजित पुरुष नारळ लढविणे स्पर्धेला प्रतिसाद…

तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांची उपस्थिती:जेष्ठ शिवसैनिक गणपत लोणे यांनी केला शुभारंभ..

मालवण दि प्रतिनिधी
मालवण दांडी येथे शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेविका सेजल सन्मेश परब आयोजित पुरुषांच्या नारळ लढविणे स्पर्धेस शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी जि. प.सदस्य हरी खोबरेकर यांनी उपस्थिति दर्शविली.स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ शिवसैनिक गणपत लोणे यांच्या हस्ते झाले.नारळ लढविणे स्पर्धेस जेष्ठ तसेच युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत हितेश खोरजुवेकर विजेता तर कल्पेश रोगे उपविजयी ठरले.

     यावेळी अरुण दुधवडकर, लिलाधार पराडकर, दांडी शाखा प्रमुख हेमंत मोंडकर, युवासेना दांडी शाखा अधिकारी भार्गव खराडे, युवा सेना विभागप्रमुख चंदु खोबरेकर,दांडी शाखा प्रमुख नारायण रोगे, विकी मिठबांंवकर, बबन खराडे, दत्ता आचरेकर, किरण कोयंडे, साईनाथ येरागी, स्वप्नील धुरी, अमन केळुसकर, विठोबा वायंगणकर, विनोद हडकर, आनंद आंबेरकर, काशिनाथ मालंडकर, भूषण आडकर, रोहित मालंडकर, गणेश तारी, आनंद आचरेकर, भगत, नितेश पराडकर, बाबा पराडकर, रोहन सारमळकर, प्रफुल्ल दुधवडकर,सुभाष मांजरेकर, सचिन गवंडे, शशांक मालंडकर, दत्ता केळुसकर, चैतन्य जोशी, वरद धुरी, सुधीर चिंदरकर,युवासेना उपशहर अधिकारी अक्षय रेवंडकर आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page