उद्या बंदर जेटी येथे शिल्पा खोत मित्रमंडळाने केले आहे आयोजन
मालवण दि प्रतिनिधी
मालवणच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांच्या वतीने नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण बंदर जेटी येथे उद्या दि ३० ऑगस्ट सायं. ४ वाजता महिला नारळ लढवणे स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले असून गेली नऊ वर्षे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. स्पर्धेतील खास आकर्षण असलेला सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याचे कॉइन, सोन्याची नथ यांचा अंतर्भाव असलेला विजेता चषक तसेच सोन्याचा कॉईन सोन्याची नथ असलेला उपविजेता चषक यासह अन्य सोन्या, चांदीच्या बक्षिसांचा दिमाखदार अनावरण सोहळा यतीन खोत यांच्या धुरीवाडा येथील निवासस्थानी महिला भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी सौ. प्रतिभा चव्हाण, सौ. चारुशीला आढाव, सौ. वैशाली शंकरदास, कोळंब सरपंच सौ. सिया धुरी, सौ. रूपा कांदळकर, शांती तोंडवळकर, नंदा सारंग , स्वाती तांडेल, सौ. कल्पिता जोशी, अश्विनी आचरेकर, चित्रा सांडव, प्रणाली गायकवाड, ज्योती तोडणकर, भाग्यश्री फोंडबा, तन्वी भगत, प्रीती बांदल, साक्षी मयेकर, मानसी घाडीगांवकर, दीक्षा जाधव, शिवानी सावंत यांसह अन्य महिला भगिनी उपस्थित होत्या.
यावर्षी स्पर्धेतील विजेत्या महिलेला सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याचा कॉईन, सोन्याची नथ तर उपविजेत्या स्पर्धकास सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्राप्त स्पर्धकाला सोन्याची नथ तसेच अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धकांना चांदीची भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासह स्पर्धक व प्रेक्षक यांसाठी लकी ड्रॉ कुपन ठेवण्यात आले असून विजेत्यांना चांदीच्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडी प्रमुख जानव्ही सावंत, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
