इन्सुली खामदेव नाका येथे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात…

बांदा तलाठी जखमी: अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविले

बांदा
मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका नजीक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने अपघात झाला. या अपघातात बांदा येथील तलाठी वर्षा जयंत नाडकर्णी जखमी झाल्या. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले. महामार्ग विभागाने खड्डे न बुजविल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी करत संबंधित विभागाबाबत नाराजी व्यक्त केली.
बांदा येथील तलाठी वर्षा नाडकर्णी या आपल्या ताब्यातील दुचाकीने सावंतवाडीहुन बांदाच्या दिशेने जात होत्या. त्या इन्सुली खामदेव नाका नजीक आले असता महामार्गाच्या मधोमध पडलेला खड्ड्यात गाडी गेल्याने गाडी महामार्गाच्या मधोमध आदळली. यात त्यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. 108 रुग्णवाहिकेने जखमी नाडकर्णी यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठवले.

You cannot copy content of this page