जिल्हा कलाकार मानधन समितीवर अजिंक्य पाताडे यांची सदस्य म्हणून निवड

⚡ओरोस ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीवर मालवण पंचायत समितीचे माजी सभापती व उत्कृष्ट भजनी कलाकार श्री.अजिंक्य कृष्णा पाताडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

सुकळवाड ता.मालवण येथील पाताडे हे भजनी बुवा व गायक म्हणून सुपरीचीत आहेत.मालवण पंचायत समितीचे सभापती पद त्यांनी अडीच वर्षे भूषविले असून अनेक उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटविला होता.एक कलाकार व प्रशासकीय अनुभव यामुळे त्यांची निवड या समितीवर करण्यात आली आहे.सदरची निवड नुकतीच उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी एका आदेशद्वारे जाहीर केली आहे.

You cannot copy content of this page