भवानी शेती सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १४ टक्के लाभांश…

२२ व्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष वालेतीन आल्मेडा यांची घोषणा..

बांदा/प्रतिनिधी
श्री भवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बांदा या संस्थेने आपल्या सभासदांना या आर्थिक वर्षात 14 टक्के लाभांश जाहीर केला आहे व संस्थेने आपला ऑडिट वर्ग अ कायम राखला आहे. संस्थेची बाविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा राजगुरु कॉम्प्लेक्स बांदा येथे पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वालेतीन आल्मेडा यांनी लाभांश जाहीर केला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, संचालक राजू वाळके, अशोक देसाई, सालू परेरा, संजय नाईक, सौ. रेश्मा आहिर उपस्थित होत्या.


संस्थेला यावर्षी 14 लाख 44 हजार रुपये नफा झाला असून भाग भांडवल 32 लाखावर गेले आहे. संस्थेने नऊ कोटी 34 लाख रुपयापेक्षा जास्त ठेवी गोळा केल्या आहेत, तर सभासदांना सहा कोटी 35 लाख रुपयाच्या वर कर्जवाटप केले आहे. यावर्षी सोने तपासणी मशीन आणल्याबद्दल संस्था व संस्था संचालकांचे सभासदांनी अभिनंदन केले. त्याचप्रमाणे संस्थेची आर्थिक परिस्थिती पाहून समाधान व्यक्त केले. या सभेचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले तर आभार संस्थेचे व्यवस्थापक भिकाजी गवस यांनी मानले.

You cannot copy content of this page