रोणापाल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

⚡बांदा ता.२६-: रोणापाल पोलिस पाटील निर्जरा परब यांच्या पुढाकाराने तसेच म्हापसा गोवा येथील देवेंद्र दिनकर धाऊसकर, चंद्रकांत साळगावकर यांच्या वतीने जिल्हा परिषद रोणापाल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शाळेसाठी उभा पंखा भेट देण्यात आला.


यावेळी पाडलोस सामाजिक कार्यकर्ते अनंत गावडे, रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, तसेच राजन परब, मंगेश गावडे, सुशांत गावडे, सुदिन गावडे, तानाजी धरणे, सिताराम गवस, मुख्याध्यापक शुभेच्छा गवस आणि विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रति असलेली ओढ पाहून म्हापसा येथील देवेंद्र धाऊसकर व चंद्रकांत साळगावकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिल्याचे निर्जरा परब यांनी सांगितले. सूत्रसंचालन शुभेच्छा गवस यांनी केले तर राजन परब यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page