कै. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धा २७ ऑगस्ट रोजी…

⚡सावंतवाडी ता.२६-: आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर, कोमसाप शाखा सावंतवाडी या संस्थांच्यावतीने ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व कोकणभूषण स्व. विद्याधर भागवत यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रविवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कै. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीराम वाचन मंदिर, येथे ही स्पर्धा होणार असून ज्येष्ठ कवी व
साहित्यिक श्री. वाय. पी. नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मित्रपरिवार यांनी या साहित्यिक उपक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page