देवगड-निपाणी रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासंदर्भात निवेदन व भेट
⚡देवगड ता.३०-: येणाऱ्या गणेशोत्सव काळात रस्त्यांवर कोणत्याही प्रकारे दुर्घटना होऊ नये तसेच लोकांची रस्त्या अभावी गैरसोय होऊ नये याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना देवगड यांच्यातर्फे देवगडमधील संबंधित विभागात जाऊन त्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. त्यांना परिस्थितीची जाणीव करून देऊन मनविसेमार्फत निवेदन देण्यात आले. संबंधित अधिकारी यांनी ही याबाबत योग्य ते नियोजन करून येत्या काही दिवसात कामे हाती घेतली जातील असे आश्वासन दिले.
याप्रसंगी मनविसे तालुकाध्यक्ष राकेश मिराशी, शहराध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, अक्षय लाड, शुभम कुंबडे, पंकज कातवनकर व असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
