⚡वैभववाडी ता.२५ संजय शेळके-: वैभववाडी तालुक्यातील नावळे गावाच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी माजी पोलीस पाटील विलास जनार्दन रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नावळे ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सोनल गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम गुरखे, रश्मी गुरव, पल्लवी गुरव, संजय शेळके, स्नेहा शेळके, माजी सरपंच संभाजी रावराणे, महेश रावराणे, तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम गुरव रमेश शेळके ठेकेदार रामचंद्र बावदाने विक रावराणे रमेश गुरव राजाराम गुरव संजय पाटील, प्रशासकीय अधिकारी अनिल घुगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
