गणेशचतुर्थी पूर्वी कुडाळ मालवणमध्ये बारा मोठे पक्ष प्रवेश…

दोन्ही तालुक्यांत भाजपला वाढता पाठिंबा मिळत आहे:२०२४ मध्ये निलेश राणे यांच्या विजयाची आहे नांदी;प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांची माहिती

मालवण दि प्रतिनिधी :
भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दर दिवशी वाढत असल्याचे चित्र मालवण कुडाळ तालुक्यात दिसून येत आहे. गणेश चतुर्थी पूर्वी अजून १२ मोठे प्रवेश होणार आहेत. २०२४ मध्ये निलेश राणे यांच्या विजयाची ही नांदी असल्याचा ठाम विश्वास भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी मालवण भाजप कार्यालय येथे बोलताना व्यक्त केला.

भाजपचे नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यात ५० टक्के सवलतीवर सायकल व एलईडी टीव्ही देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ आज भाजप मालवण कार्यालय येथे भाजपचे प्रदेश सदस्य दत्त्ता सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम नोंदणी केलेल्या नागरिकांना सायकल व टीव्ही वितरित करण्यात आले.

यावेळी यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, भाजप महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, पूजा वेरलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, पूजा सरकारे, अन्वेषा आचरेकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, जगदीश गांवकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, संचालक आबा हडकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, पंकज पेडणेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, बंड्या पराडकर, विलास मुणगेकर, प्रमोद करलकर, मोहन वराडकर, दत्तात्रय केळुसकर, राजू बिडये, निनाद बादेकर, राज कांदळकर, राजा मांजरेकर, वसंत गांवकर, कमलाकर कोचरेकर, महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, महानंदा खानोलकर, प्रशांत बिरमोळे, बाबू कासवकर, ओंकार लुडबे, यशवंत मालंडकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page