वसुंधा वंदन उपक्रमांतर्गत कणकवली पं.स.च्या परिसरात वृक्षारोपण

⚡कणकवली ता.१८-: स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी समारोपांतर्गत देशभर ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत असलेल्या वसुंधा वंदन उपक्रमांतर्गत कणकवली पंचायत समितीच्या परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करत त्या रोपांच्या संवर्धन व संगोपणाची जबाबदारी घेतली.

‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानांतर्गत कणकवली पंचायत समितीच्या आवारात गुरुवारी सकाळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर माजी सैनिक व पंचायत समितीचे कर्मचारी असलेल्या रुजाय बारेत, महेश गावडे यांचा पंचायत समितीतर्फे सन्मान करण्यात आला. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीच्या परिसरात रायवळ आंबा, काजू, सुपारी, नारळ, आवळा, कडुलिंबू, पेरु, बदाम अन्य देशी झाडांचे रोपण केले आणि प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांने लावलेल्या रोपट्याच्या संवर्धन व संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक रोपट्याचे जीओ टॅगिंग देखील करण्यात आले आहे.
या उपक्रमांमध्ये गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, एकात्मिक बाल विकास विभागाच्या अधिकारी उमा हळदवणेकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, रामचंद्र शिंदे, सुनील पागम, रवी मेस्त्री, प्रमोद ठाकूर,सतीश जाधव,कक्ष अधिकारी अनिल चव्हाण, अधीक्षक मनीषा देसाई, चंद्रसुभाष परब, पी. एन. गुरसाळे, आर. पी. सुतार, गणेश कडुलकर, सुप्रिया सावंत, धानू धुरी,श्रीमती देवरुखकर यांच्यासह पं. स. चे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page