श्री देवी माऊली मंदिरात सोमवारी श्रावणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधी
फुकेरी ग्रामस्थांच्या वतीने येथील श्री देवी माऊली मंदिरात सोमवार दिनांक २१ रोजी श्रावणोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


पहिल्या सत्रात एकनाथ आईर, निलेश आईर, ओंकार गावडे, नारायण आईर, अमृत आईर, रवींद्र आईर हे नामस्मरण करणार आहेत. दुसऱ्या सत्रात रात्री ८ वाजता भूमी आईर हा विद्यार्थी स्रोत, शिवस्मृती पसायदान म्हणणार आहे. पवित्रा आईर मारुती स्रोत, यश आईर गणपती स्रोत, आयुष आईर गणेश वंदना, गौरवी आईर रामरक्षा, कल्पेश आईर गणेश मंत्र, प्रथमेश आईर हरिपाठ, बाळकृष्ण आईर हे अध्यात्मवर प्रवचन सादर करणार आहेत.
भाविक व भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन फुकेरी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page