मुंबई गोवा महामर्गाचे काम पूर्ण करण्यासाठो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: महामार्गाच्या रखडलेल्या कामा संदर्भात रायगडच्या पत्रकारानी ९ ऑगस्ट क्रांतिदिनी केलेल्या बोंबाबोंब आंदोलनाला सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने पाठींबा देत महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणीसाठो जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
मुख्यालय पत्रकार संघामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिद्र सुकटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, सचिव लवू म्हाडेश्वर, उपाध्यक्ष विनोद परब,सहसचिव सतीश हरमलकर ,नंदकुमार आयरे, दत्तप्रसाद वालावलकर ,विनोद दळवी,मनोज वारंग ,संजय वालावलकर उपस्थित होते.
मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि तब्बल बारा वर्षे रखडलेले महामार्गाचे काम याचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्या मधील पत्रकारांनी 9 ऑगस्टला क्रांतिदिनी बोंबाबोंब आंदोलन केले. या आंदोलनाला जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ सिंधुदुर्गनगरी पाठीबा देत असल्याचे निवेदन सादर केले .
महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले असले तरी रत्नागिरी रायगड मध्ये काम पूर्ण झालेले नाही आणि कामात गतीही दिसत नाही . त्यामुळे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे यांसाठो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना पत्रकाराच्या तीव्र भावना कळवाव्यात अशी मागणी करण्यात आली .
