हरियाणातील आपदामित्र कार्यशाळेसाठी वैभव खोबरेकरची निवड

⚡मालवण ता.०९-: आपत्कालीन मदतकार्यासाठी सदैव तत्पर असणारे देवबाग येथील वैभव खोबरेकर यांची हरियाणातील फरिदाबाद येथे दि. ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एकदिवसीय आपदामित्र कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली असून वैभव हा हरियाणासाठी रवाना झाला आहे. आपत्कालीन विभागाचे देशभरातील अधिकारी आणि स्वयंसेवकांचा या कार्यशाळेत सहभाग असणार आहे.

वैभव खोबरेकर हे मालवणातील विघ्नहर्ता आपत्कालीन दलातील सक्रिय सदस्य आहेत. विविध ठिकाणी येणाऱ्या पूरस्थिती, दुर्घटना तसेच अलीकडे झालेली इर्शाळवाडीतील दरड कोसळण्याची दुर्घटना मध्ये मदत कार्य, बुडालेल्यांचे मृतदेह शोधमोहीम, पाण्यात पडलेल्या वस्तू शोधण्याकामी पोलिसांना सहकार्य अशा विविध बचाव आणि मदतकार्यात खोबरेकर सहभागी झाले आहेत. फरिदाबाद येथे होणाऱ्या आपदामित्र प्रशिक्षण शिबिरात युनिसेफच्या नलिनी यादव, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत आणि यश नाईक यांचाही समावेश आहे.

You cannot copy content of this page