वयोवृद्ध महिलेचा खून करणाऱ्या विरोधात निषेध मोर्चा

सोनाळी, नावळे गावासह तालुकावसिय एकवटले:संशयिताला अधिकाधिक शिक्षा देण्याची केली मागणी..

वैभववाडी प्रतिनिधी
सोनाळी वाणीवाडी येथील वयोवृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या आरोपीला फाशी झालीच पाहिजे… पोलीस प्रशासन जिंदाबाद… अशा प्रकारच्या घोषणा वैभववाडी दत्त मंदिर चौक ते पोलिस ठाण्या पर्याय देत तालुकावासीय व सोनाळी आणि नावळे गावातील ग्रामस्थांनी शुक्रवारी एकवटले त्या घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा काढला त्यानंतर पोलिस निरीक्षकांशी भेट घेत संशयित आरोपीला अधिकाधिक शिक्षा व्हावी असा तपास करावा असी निवेदन देऊन मागणी केली.पोलिसानीही आपला तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट केले.


सोनाळी हत्याकांड प्रकरणातील आरोपी सचिन निखार्गे याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. तसेच वैभववाडी पोलिसांनी जलद तपास करून आरोपीला गजाआड केले. पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल कौतुकास पात्र आहेत. परंतु या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, भर चौकात फाशी झाली पाहिजे, अशा घोषणा महिलांनी देत आपला कोध्र व्यक्‍त करीत होत्या. सुमारे 200 हून अधिक महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या, एकूणच या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याच्या नातेवाईकांना ही गावात थारा देऊ नये अशी मागणी महिलांनी केली आहे.
मात्र श्रीमती जयश्री साटम यांची क्रुर पध्दतीने हत्या केली होती.त्यामुळे सर्वच क्षेत्रातुन या घटनेचा निषेध केला जात होता.विविध राजकीय पक्षांनी पोलिसांना निवेदन दिली मात्र शुक्रवारी नावळे, सोनाळीसह विविध गावांतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी या क्रुर प्रवृत्ती विरोधात एकवटली यामध्ये तालुकाध्यक्ष नाशीर काझी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, अरविंद रावराणे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, प्राची तावडे, नावळे सरपंच सोनल गुरव, सोनाली सरपंच भीमराव भोसले, संस्थेचे संचालक संदीप पाटील ,माजी सरपंच प्रकाश पाटील, सत्यवान पाटील, संजय रावराणे, शिवसेना( शिंदे गटाचे) तालुका प्रमुख संभाजी रावराणे, माजी पोलीस पाटील विलास रावराणे, संजय पाटील,नवलराज काळे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गुरव, गुणवंत राणे,आदी या आंदोलनात सर्व पक्षांचे पदाधिकारी नावळेसह सोनाळी गावचे ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी पोलिसांना निवेदन देण्यात आले.
तसेच पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांना आमदार नितेश राणे यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या दृष्टीने तपास करावा अशा सूचनाही दिल्या.
तसेच पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी जमावाला सामोरे जात आपल्या भावनांशी सहमत आहे, आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्यादृष्टीने तपास योग्य दिशेने सुरू आहे. शिक्षा देण्याचा अधिकार मा. कोर्टाला आहे आमचा तपासाचा भाग आहे, आम्ही त्या दृष्टीने तपास केलेला असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
फोटो १) पोलिस निरीक्षकाना निवेदन देताना नावळे व सोनाळीसह सर्व पक्षीय पदाधिकारी.
२) वैभववाडी दत्त मंदिर ते पोलिस ठाण्या प्रयत्न बाजार पेठेतुन काढलेली निषेध रॅलीत सहभागी सर्व पक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page