ग्राम पंचायत सदस्य रत्नाकर आगलावे यांनी राबविला उपक्रम
बांदा/प्रतिनिधी
येथे एमएनजीएल कंपनीकडून करण्यात आलेल्या गॅस पाईपलाईनच्या खोदकामावेळी बांदा वाफोली मार्गे कोल्हापूर या मुख्य रस्त्याला मला मोठा चर पडला होता. त्यामुळे या ठीकाणी गेले महीनाभर अनेक लहान-मोठे अपघात घडत होते. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत यांना देखील सुचित करण्यात आले होते. परंतु ग्रामपंचायत, राष्ट्रीय महामार्ग विभाग व एमएनजीएल कंपनीस वारंवार विनंती करून देखील यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे लोकांच्या व प्रवाशांच्या गैरसोईचा विचार करून प्रभाग क्रमांक तीन मधील ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे यांनी स्वखर्चाने सदर पडलेली भली मोठी भेग स्वखर्चाने दुरुस्त करत लोकांची होणारी गैरसोय दूर केली.
याबाबत या मार्गांवरून ये-जा करणान्या तसेच आजुबाजुच्या गावातील लोकांनी समाधान व्यक्त केले.
