वनविभागाविरोधात प्रांत कार्यालयासमोर स्वातंत्रदिनी उपोषणाचा इशारा…

चौंडू पाटील : आंबोलीत एकतर्फी अतिक्रमण कारवाई

आंबोली,ता.४: येथील वनविभागाने घाटातील माझा एकमेव स्टॉल हटवला तसेच सामान भरून नेताना मी विचारण्यासाठी गेलो असता अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी गटारात पडून जखमी झालो त्यामुळे आंबोली, सावंतवाडी आणि बांबोळी येथे उपचार घेतले मला गंभीर दुखापत झाली.आंबोली आरोग्य केंद्रासमोर तसेच इतर ठिकाणी रिजर्व फॉरेस्ट आणि इतर ठिकाणी स्टॉल वर कारवाई का करण्यात आली नाही,संबंधित अधिकार्यांनी त्या ठिकाणी कोणती सेटलमेंट केली,त्यामुळे माझ्यावरच एकतर्फी पूर्वनियोजित पणे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी सातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट ला प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर चौंडू धोंडू पाटील यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा निवदनाद्वारे दिला आहे.

२६ जुलै रोजी आपला आंबोली घाटातील स्टॉल वनविभागाने बेकायदा हटवला.तसेच आपल्याला ढकलून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.तसेच आपल्यावर एकतर्फी कारवाई केली.आंबोलीत आरोग्य केंद्रासमोर असणाऱ्या महिनाभरापूर्वी पत्र्याची शेड घातलेल्या स्टॉलवर कारवाई का केली नाही.१५ गावांचे आरोग्य केंद्र आहे.पर्यटनस्थळांचे आरोग्य केंद्र असताना समोर अशाप्रकारे स्टॉल घातला त्या वेळी वनखाते झोपले होते काय.त्या ठिकाणच्या वनरक्षक आणि वनपाल तसेच वन अधिकाऱ्यांना आपली ड्युटी दिसली नाही काय असा सवाल चौंडू पाटील यांनी केला आहे.तसेच आपल्याच स्टॉल वर ठरवून पूर्वनियोजित कारवाई करण्यात आली आहे.मला यामुळे गंभीर दुखापत झाली आहे.माझा आर्थिक मार्ग खुंटल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीसाठी चौंडू पाटील यांनी १५ ऑगस्ट रोजी जपोषणाचा इशारा प्रांताधिकारी याना निवेदन दिले आहे. दरम्यान वन अधिकाऱ्यानी आंबोली पोलीस स्थानकात सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी १८६ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तशी ४१ अ’ ची नोटीस पाटील यांना देण्यात आली आहे. चौंडू पाटील यांनी याबाबत आता सेटलमेंट करून फक्त एकतर्फी कारवाई करणाऱ्या आणि बाकी ठिकाणी सेटलमेंट करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात आता लढण्याचा इशारा दिला आहे.

You cannot copy content of this page