⚡मालवण ता.०४-: आयडियल फाउंडेशन सोशल वेल्फेअर, कुंभारमाठ मालवण या संस्थेच्या वतीने कणकवली येथील नगर वाचनालय येथे दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत स्वयंरोजगार मेळावा मोफत स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.
या मोफत स्वयंरोजगार मेळाव्यात आभा (आयुष्यमान भारत डिजिटल मिशन इंडिया) हा उपक्रम राबवायचा आहे. प्रत्येक व्यक्तीस आधारकार्ड पूर्तता करण्यासंबंधी मासिक व हंगामी मानधनावर स्वयंसेवक नेमणूका करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करावयाचे आहे. या मेळाव्यात संस्थेचे विविध उद्दिष्टे स्वयंरोजगार व शासनाच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील तरुण तरुणींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. यु. एम. जाधव यांनी केले आहे.
