नवीन शिधापत्रिका देताना ‘त्या’ शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी

आप्पा लुडबे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

⚡मालवण ता.०४-: सिंधुदुर्गात नवीन शिधापत्रिका बनविताना सर्वसामान्यांना अनेक समस्या भेडसावत असल्याने शासनाच्या सन २०१३ मधील संबंधित निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मालवणचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन शिधापत्रिका देताना शासन निर्णय क्र. शिवाप २०१३ / प्र. क्र. १०५ / नापु २८ या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. या शासन निर्णयानुसार नवीन शिधापत्रिका मागणी करणारी व्यक्ती, कुटुंब वेगळे राहत असल्याची खात्री करून त्यांना शिधापत्रिका द्यायची आहे. परंतु पुरवठा विभाग नवीन शिधापत्रिकेसाठी नवीन घर नंबर किंवा वेगळा घर नंबर मागते. शिधापत्रिका न देता अर्ज निकाली काढला जातो. नवीन घर नंबर किंवा घराचे धडे वाटप न्यायालयामार्फत होतात व त्यासाठी काही वर्षाचा कालावधी जातो. त्यामुळे एकाच घरात वेगवेगळी राहणारी अनेक कुटुंब असूनही त्यांना एकच शिधापत्रिका असल्याने त्यांची अडचण होते तसेच आपापसात वाद निर्माण होतात. त्यामुळे २०१३ मधील शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत आणि सर्वसामान्य जनतेचे होणारी अडचण दूर करावी अशी मागणी आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

You cannot copy content of this page