⚡मालवण ता.०४-: मालवण शहरातील मेढा राजकोट येथे गेले वर्षभर बंद अवस्थेत असलेली स्ट्रीट लाईट माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी स्व:खर्चाने पूर्ववत करून दिली आहे.
मेढा राजकोट भागातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवक दिपक पाटकर यांचे लक्ष वेधले होते. दिपक पाटकर यांनी स्व:खर्चाने या स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करत ती पुन्हा सुरु केली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी पाटकर यांचे आभार मानले. यावेळी दिपक पाटकर यांच्यासह भाजयुमो मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण, निनाद बादेकर, शुभम लुडबे, राजा मांजरेकर आदी उपस्थित होते.
