सरचिटणीस निलेश राणे यांनी केले स्वागत
⚡कुडाळ ता.०३-: कसाल गावचे सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य राजन परब यांनी आज आपल्या ग्रामपंचायत सदस्यांसह भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे भाजप पक्षात प्रवेश केला.
राजन परब हे आमचे राणे कुटुंबातले आहेत. त्यांची कामे आपण पूर्ण करू. आमच्या पक्षात त्यांचे स्वागत आहे, असे निलेश राणे म्हणाले.
राजन परब हे कसाल ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष सरपंच उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यांनी तेथे विजयाचा करिश्मा केला होता. गावचा सरपंच असलो तरी विकास हा महत्वाचा आहे. हा दूरदृष्टीकोन ठेवून त्यांनी भाजप पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी भाजप नेते विशाल परब, संजू परब, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, प्रकाश मोर्ये, विकास कुडाळकर, आनंद शिरवलकर, विनायक राणे बंड्या मांडकुलकर मोहन सावंत, रुपेश कानडे, विलास कुडाळकर, राकेश कांदे कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
