महसूल विभागाने नागरिकांच्या घरी पोहोचविले दाखले

वैभववाडी प्रतिनिधी
शासनाच्या महसूल विभागामार्फत तालुक्यातील लाभार्थ्यांना घरपोच दाखले देण्यात आले. 1 ऑगस्ट पासून राज्यभर महसुल सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दुस-या दिवशी वैभववाडी तालुक्यात सोनाळी, सांगुळवाडी, कुर्ली, बांधवाडी, भूईबावडा, कुसुर आदी गावातील लाभार्थीना महसूल विभागाकडे मागणी केलेले दाखले आज घरपोच देण्यात आले. यामध्ये उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, आदीचा समावेश होता. तलाठी, मंडळ अधिकारी यानी लाभार्थीना घरपोच केले.

सोनाळी, सांगुळवाडी, कुर्ली येथे हे दाखले वैभववाडी उपविभागीय अधिकारी तथा परिविक्षाधीन जिल्हाधिकारी (भा.प्र.से.) करिष्मा नायर यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार दिग्वीजय पाटील उपस्थित होते. तर मंडळ स्तरावर फेरफार अदालत ही आयोजित करण्यात आली होती.

You cannot copy content of this page