⚡सावंतवाडी ता.०३-: वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या “सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप २०२३-२४”या स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या फुटबॉल संघाने (१७वर्षाखालील वयोगट) नॅशनल स्कूल नर्डिवे या संघाचा पराभव करुन तिसरा क्रमांक पटकावला.तर विद्यार्थिनींच्या संघाने(१७ वर्षांखालील वयोगट )प्रथम कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी व डॉन बॉस्को स्कूल ओरोस या संघांचा पराभव केला.व दुसरा क्रमांक पटकावला.या स्पर्धेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांचे प्रोत्साहन व क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे मोलाचे मार्गदर्शन मिलाग्रिस हायस्कूल च्या संघास मिळाले.
तसेच प्रशालेचा विद्यार्थी कु.जगदिश दोडामानी याची सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन संघात निवड झाली असून तो नगर ला होणाऱ्या २७ अॉगस्ट ते १ सप्टेंबर ला होणाऱ्या स्पर्धेत खेळणार आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
