⚡वेंगुर्ला ता.०३-: मळेवाड-आरोस येथे १ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कथानक स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता नववीमधील विद्यार्थीनी स्नेहा प्रकाश वेंगुर्लेकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत जिल्ह्यातील ६० स्पर्धक सहभागी झाले होते. कु. स्नेहा हिला प्रा. वैभव खानोलकर सर व अजित केरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, सर्व शिक्षक, संस्था चेअरमन विरेंद्र आडारकर, सचिव रमेश नरसुले, निलेश मांजरेकर, कार्यकारिणी सदस्य, पालक-शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
