न्यू इग्लिश स्कूल येथे महसूल सप्ताहानिमित्त युवा संवादाचे आयोजन

⚡मालवण ता.०२-: महसूल विभागाने वर्षभर केलेल्या लोकाभिमुख कामकाजाचा आढावा लोकांसमोर ठेवण्यासाठी एक ऑगस्ट ला राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा केला जातो.जनतेला अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आचरे येथिल न्यू इंग्लिश स्कुल येथे आचरा मंडल अधिकारी अजय परब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महसूल तर्फे आवश्यक विविध दाखल्यांबाबत शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच ई पिक पाहणी अँप बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक गोपाळ परब, तलाठी संतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी, महाग सेवा केंद्राच्या यशश्री गोसावी, तसेच अन्य शिक्षक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page