⚡कणकवली ता.०२-: लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी स्व.विष्णू शंकर पडते गुरुजी यांच्या स्मरणार्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम सर्व रोटरीयन्स व विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या सहकार्याने पार पडला.
इव्हेंट चेअरमन रो.सौ मेघा गांगण व रो.सौ. दिशा अंधारी यांनी अथक परिश्रम घेतले.प्राथमिक शाळा गटातून 15 स्पर्धक व माध्यमिक शाळा गटातून 13 स्पर्धकानी या स्पर्धेत सहभाग घेतला.
या वक्तृत्व स्पर्धेचे विषय प्राथमिक गट वेळ 4 मिनिटे 1) लोकराजा छत्रपती शाहू महाराज 2)लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 3) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 4)प्लास्टिक बंदी काळाची गरज
माध्यमिक गट वेळ 6 मिनिटे 1) लोकमान्य टिळक लोकशाहीचे आद्य प्रणेते 2) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
3)राजश्री शाहू महाराज शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते 4)समाज माध्यम ( सोशल मीडिया) व भारतीय तरुणाई 5)कोरोना नंतर विद्यार्थ्यांची बदललेली मानसिकता हे होते.यावेळी विद्यामंदिर प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळे मार्गदर्शन मिळाले.श्री .मंडवी यांनी मार्गदर्शन केले व सौ रुपाली कदम यांनी वकृत्वस्पर्धा विषयाची मांडणी कशी असावी याचे स्पर्धकांना मार्गदर्शन केले
चार्टर प्रेसिडेंट रो.दीपक बेलवलकर,दीपक अंधारी व दादा कुडतरकर तसेच रो. सौ. उमा परब यांचा या रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल समन्वयीत कार्यक्रमाला सहभाग होता.
प्रत्येक गटातून तीन विजेत्या स्पर्धकांना व एक उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सौ. मेघा गांगण यांनी वडील कै. विष्णू शंकर पडते यांच्या स्मरणार्थ विद्या मंदिर हायस्कूलमधील सात हुशार, गरीब व होतकरू मुलांना दप्तरे व छत्री वाटप करून आपल्या वडिलांचा दानशूरतेचा वसा पुढे चालवून आदरांजली वाहिली .स्पर्धेमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, सेंट उर्सुला स्कूल, एस एम हायस्कूल, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली.
कनेडी हायस्कूल, नाटळ हायस्कूल, शंकर महादेव विद्यालय कुंभवडे, करूळ हायस्कूल, प्रगत विद्यामंदिर रामगड, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे, माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी, वामनराव महाडिक हायस्कूल तळेरे, जी प. शाळा हुमरठ, ल गो सामंत विद्यालय हरकुल बुद्रुक.
प्राथमिक शाळा विभागातून कु. कर्तुत्वा हरकुळकर (प्रथम क्रमांक विद्यामंदिर हायस्कूल). द्वितीय कुमारी मीरा आपटे,( कनेडी हायस्कूल), तृतीय वरद तवटे (सेंट उर्सुला स्कूल )व उत्तेजनार्थ संतोषी आळवे,( जि प शाळा क्रमांक दोन कणकवली)
माध्यमिक शाळा विभागातून प्रथम कु. प्रतीक्षा पाटील( ल.गो. सामंत विद्यालय हरकुळ बुद्रूक), द्वितीय
कु.तन्वी पारकर (करूळ हायस्कूल), तृतीय भावना सावंत (शंकर महादेव विद्यालय,कुंभवडे) व उत्तेजनार्थ विधी चिंदरकर, (विद्यामंदिर हायस्कूल) यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
प्राथमिक व माध्यमिक विभाग प्रथम पारितोषिक पुरस्कर्ते रो. सौ मेघा गांगण. दोन्ही विभाग द्वितीय पारितोषिक पुरस्कर्ते चार्टर प्रेसिडेंट दीपक बेलवलकर. तृतीय पारितोषिक पुरस्कर्ते सौ. मेघा गांगन व डॉ. सुहास पावसकर. उत्तेजनार्थ पारितोषिके डॉ. विद्याधर तायशेटे यांनी दिली होती.
प्रेसिडेंट रो.शंकर परब यांनी सर्वांचे आभार मानले.
