बांदा दशक्रोशीतील 25 गावे अंधारातच…

३० तासाहून अधिक काळ उलटला ; बिघाड दूर करण्यास अपयश

⚡बांदा ता.२९-: महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रातील बिघाड दूर करण्यात तांत्रिक टीमला अद्यापही अपयश आल्याने बांदा शहरासह दशक्रोशीतील २५ गावे ३० तासाहून अधिक काळ अंधारात आहेत. ब्लॅक आउट झाल्याने याचा सर्वाधिक फटका बांदा शहराला बसला. शहरातील उद्योग व्यापार व बँकिंग सेवेवर याचा परिणाम झाला. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु असून लवकरच पुरवठा पूर्ववत करण्याचे मोठे आवाहन महावितरणसमोर आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्री ३ वाजता इन्सुली उपकेंद्रात स्फोट झाल्याने पॅनेल जळून खाक झालीत. त्यामुळे बांदा दशक्रोशीतील २५ गावे अंधारात बुडाली आहेत. काल दिवसभर महावितरणचे २५ हून अधिक कर्मचारी व अधिकारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. रात्री उशिरापर्यंत काम सुरु होते.

You cannot copy content of this page