उभा बाजार परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली..

दोन दिवस नागरिकांना पाणीटंचाई; सुरेश भोगटे यांच्यासह नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरले धार्‍यावर

सावंतवाडी ता.२९-: येथील शहराच्या उभा बाजार चितार आळीच्या काही भाग वैश्य वाडा च्या काही भाग गेले दोन दिवसापासून पाण्यापासून वंचितकलावती मंदिर कडून माठेवाडा येथे येणारी पाण्याची लाईन फुटल्याने नागरिकांची पाण्यापासून तारांबळ उडाली ही बाब येथील नागरिकांनी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने सुरेश भोगटे यांनी नगर परिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी श्री भाऊ भिसे ,लाईनमन लाखे यांना सकाळी पहाटे धारेवर धरले पाणी लोकांना मिळत नसल्याबाबत जाब विचारला तात्काळ टँकरने पाणी देण्यासाठी भाग ही भोगटे यांनी पाडले.

दरम्यान लाईन दुरुस्तीची मागणी केली मात्र दोन दिवस लाईन फुटून झाले असून सुद्धा रिपेरिंग का होत नाही दोन दिवस कशाला अशा अनेक प्रश्न करून अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यावर वॉटर सप्लाय च्या अधिकाऱ्याने तात्काळ लाईन दुरुस्तीची करून काम मार्गी लावतो व पाणीपुरवठा पूर्ववत करतो असे आश्वासन ही भोगटे यांना दिले.यावेळी नागरिकांनी रोष देखील व्यक्त केला.

You cannot copy content of this page