भाजपाचा निष्ठावान युवा कार्यकर्ता संदीप गावडे…

समाजसेवेचा वसा घेऊन…सह्याद्री पट्ट्यात विकासकामांचा धडाका…

⚡सावंतवाडी ता.२९-: जनतेचे काम कोणतेही असो ते तडीपार नेणार युवा नेतृत्व म्हणून आज फणसवडे गावचे सुपुत्र संदिप गावडे याच्याकडे पाहीले जाते. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ता व उद्योजक आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खास विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात अशा या तडफदार निष्ठावान कार्यकर्त्याचा आज वाढदिवस होत असून त्याना ग्लोबल महाराष्ट्र’कडून खुप खुप शुभेच्छा…!!!!

फणसवडे सारख्या अति दुर्गम भागात जन्मलेले संदीप गावडे मुंबई पर्यंत केलेला प्रवास थक्क करणारा असा आहे. त्यांच्या या प्रवासामध्ये अनेक उलथापालथ झाल्या तरी त्यांनी भाजपा व समाजसेवेचा वसा सोडलेला नाही. उद्योग व्यवसाय करताना समाजसेवा आणि दानशूरपणाचा हात त्यांनी कायमच पुढे ठेवला. त्यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये संदीप गावडे यांच्या नावाचा बोलबाला आहे.संदीप एकनाथ गावडे यांचा जन्म २९ जुलै १९८६ ला फणसवडे येथे झाला. त्यांचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले आहे. त्यांनी फणसवडे ते मुंबई पर्यंतचा केलेला प्रवास हा थक्क करणारा आहे. त्याहीपेक्षा त्यांच्या पाठीशी पालका सारखे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सदैव आशीर्वाद लाभले. या आशिर्वादासाठी संदीप गावडे यांची सचोटी, प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडली.प्रत्येक काम संदीप गावडे तडीस नेतात संदीप गावडे यांनी उद्योग व्यवसाय करत मुंबई पर्यंत प्रवास केला त्यानंतर त्यांनी सावंतवाडी तालुका पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि ते पंचायत समिती सदस्य झाले. पंचायत समितीची सदस्य झाले असताना त्यांनी तळागाळात जाऊन समाजसेवा केली. तरुणांना रोजगार मिळावा, तरुण विविध क्षेत्रात पुढे यावे असा त्यांनी मनाशी बाळगून प्रोत्साहन देत त्यांनी सदैव यशस्वी पावले टाकली .यामुळे भाजपाचे आंबोली मंडल अध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
सह्याद्री पट्ट्यातील विकास कामाबाबत समाजसेवक ते आघाडीवर राहिले आणि त्यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सदैव आशीर्वाद दिलेत त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो असे ते अतिशय अभिमानाने सांगतात. कोरोना काळात सर्वत्र हाहाकार उडाला होता. या काळात देवदूता सारखे संदीप गावडे सह्याद्रीच्या पट्ट्यात जाऊन त्यांनी औषधे, सॅनिटायझर असं विविध सेवा सुविधा गावांमध्ये केल्या आणि लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली त्यामुळे त्यांच्या समाजसेवेला जनतेने प्रेरणा दिली. याशिवाय त्यांनी शालेय गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या ,गणवेश वाटप करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला. आरोग्यसेवा ,रक्तदान असे करताना नवनवीन कार्यकर्ते घडविणे हे त्याने कायमच आपल्या मनाशी बाळगून प्रयत्न केला.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर भाजपने सह्याद्री पट्ट्यातील ग्रामपंचायतची जबाबदारी दिली होती. संदीप गावडे यांनी त्यात शंभर टक्के यश मिळवले. भाजपाचे आंबोली मंडळ अध्यक्ष पदाला न्याय दिला.या पदाचा पुरेपूर उपयोग करून भाजपा संघटना वाढवण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले.सावंतवाडी पंचायत समिती सदस्य, भाजपा मंडळ अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली आणि समाजसेवेच्या वसा पुढे चालू ठेवला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर त्यांनी गोरगरीब जनतेच्या किंवा विकास कामाच्या बाबत प्रश्न ठेवल्यानंतर तो जलद गतीने मार्गी लागतो त्यामुळे ते या समाजसेवेच्या कामांमध्ये आघाडीवर राहू शकले असे त्यांनी बोलताना सांगितले. त्यांच्यासारखा तरुण तडफदार कार्यकर्ता भाजपला लाभला आणि भाजपा संघटन तळागाळात मजबूत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला हे ते भाग्य समजतात.भाजप आणि भाजप या मताचेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत त्यामुळे संदीप गावडे देखील भाजप आणि भाजपच या तत्त्वानेच आपल्या नेत्याचा झेंडा आपल्या नेत्याचा नावलौकिक व्हावा म्हणून तळागाळातील लोकांना एकत्रित करून जनसेवेचे व्रत हाती घेऊन फडकावत आहेत.
आंबोली व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप प्रश्नावर शासनाने निर्णय घेतला या निर्णयाचे खरे शिलेदार संदीप गावडे आहेत. त्यांनी एक पत्र सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सादर केले आणि तेच पत्र या निर्णयाला कारणीभूत ठरले असे ते मानतात .त्यांच्यात पत्रावर प्रशासनाचे आणि मंत्र्यांचे शेरे बसले आणि कबुलायतदार गावकर प्रश्न तडीस निघाला.

अल्पावधीतच केलेली विकासकामे

संदीप गावडे यांच्या प्रयत्नातून पारपोली-देवसू-दानोली रस्त्याला डांबरीकरणासाठी नव्याने वाढीव ३० लाख रुपये मंजूर !सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून वाढीव रू. ३० लाख रुपये निधी पारपोली-देवसू-दानोली रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजूर झालेला आहे.
सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकामच्या बजेट मधून सदर निधीची तरतूद झाली आहे.
मागील मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्याला ५० लाख रुपये मंजूर केले होते. सदर मंजूर कामामध्ये देवसू नागझरी येथील
चढावापासून खराब संपूर्ण रस्ता तसेच देवसु चर्च परिसरात खराब झालेला रस्ता धरून एस्टिमेट बनवण्यात आले होते.
पारपोली गावातील राहिलेल्या खराब रस्ते डांबरीकरण करण्याच्यासाठी वाढीव निधीची आवश्यकता होती.सदर गरज ओळखून आज रू.३० लाख (तीस लाख रुपये) हे फक्त पारपोली मधील खराब झालेली लांबी दुरुस्त करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत.
पावसाळ्याच्या समाप्तीनंतर दसरा किवा दिवाळीपासून नव्याने वाढीव मंजूर केलेले रू.३० लाख व मागील मंजूर झालेले
रू.५० लाख (ज्याचे याधी टेंडर झाले आहे) अशा एकूण रूु.८० लाखांच्या कामाची सुरुवात लबकर होईल तसा पाठपुरावा कार्यकारी अभियंता सावंतवाडी बांधकाम विभाग यांच्याशी करून घेवू .नकारात्मक कृतीला सकारात्मक कामातून दिलेले हे उत्तर आहे. सध्या चालू असलेले खड्डे भरण्याचे काम ह्याचा सदर मंजूर कामांशी म्हणजे रू.३० लाख किंवा
रु.५० लाख च्या निधीशी कोणताही संबंध नाही.नव्याने झालेल्या निधी मंजुरी बद्दल पारपोली भाजपचे अभिनंदन व निधी मंजूर करणारे आमचे नेते सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे आभार मानले आहेत.
चौकुळ गोनसाठवाडी येथे कॉजवे नाही तर नवीन पुल मंजूर!नवीन पूलासाठी रू.८० लाख मंजूर.

You cannot copy content of this page