तालुका खरेदी विक्री संघाचे आयोजन
वैभववाडी संजय शेळके
गुरुवार दि. 27 जुलै रोजी सकाळी ठीक 10 वाजता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात एक लाख पंचवीस हजार “पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र” सुरू होत आहेत. राजस्थानमधून पंतप्रधान या योजनेचा शुभारंभ करत आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पंचायत समिती सभागृह वैभववाडी येथे वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी केले आहे.
