उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य:४७ रक्तदातांनी घेतला लाभ…
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना यांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून एकूण 47 रक्तदापतेने रक्तदान केले.
ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी शिवसेनेच्या वतीने 26 आणि 27 जुलै ला विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, याचाच भाग बुधवारी रक्तदान शिबिर पार पडलं या रक्तदान शिबिरासाठी 47 रक्तदात्यांनी रक्तदान केलं.*
युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व रक्तदात्यांचे भेटवस्तू देऊन आभार मानण्यात आले.
यावेळी मुंबईचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक -संदीप सरवणकर, मुंबईचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक -हेमंत बावधनकर, जिल्हा बँक संचालक- दिगंबर पाटील, उपजिल्हाप्रमुख -नंदू शिंदे , तालुकाप्रमुख -मंगेश लोके, युवासेना जिल्हाचिटणीस- स्वप्निल धुरी, विभाग प्रमुख- जितेंद्र तळेकर ,युवा सेना विभाग प्रमुख -रोहित पावस्कर ,वैभववाडी शहर प्रमुख- शिवाजी राणे,उपशहर प्रमुख -सुनील रावराणे, नगरसेवक- मनोज सावंत,उपविभाग प्रमुख- यशवंत गवाणकर, विलास नावळे,राजेश तावडे, बबन धुरी, विलास पावसकर यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
